रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईला बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी त्याच्या बदलीची बातमी येताच एकच खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जवळजवळ दोन अडीच वर्षे जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे धनंजय कुलकर्णी यांची बदली विशेष शाखा बृहन्मुंबई येथे झाली आहे.

banner 728x90 banner 728x90


रत्नागिरी मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून धनंजय कुलकर्णी यांनी उत्तम प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यात काम केलेले असून सगळीकडे समन्वय साधलेला होता.


दरम्यान एक चांगला अधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकीर्द रत्नागिरीत केली होती. त्याचबरोबर इतर सामाजिक कार्यक्रमातही त्यांनी आवर्जून सहभाग घेतला होता.

आणि लोकांशी ही त्यांचे नाते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जपले होते त्यामुळे एक चांगला अधिकारी म्हणून धनंजय कुलकर्णी यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांची बदली मुंबईला झाल्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *