Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

खेड : तिघे प्रयागराज कुंभमेळ्यातून बेपत्ता

banner 468x60

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यासाठी २५ जानेवारी रोजी खेड तालुक्यातून गेलेले तीन भाविक बेपत्ता झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये सचिन आर. चव्हाण (वय २२), सिद्धांत राठोड आणि गिरीजाबाई (वय ४८) यांचा समावेश आहे.

banner 728x90 banner 728x90

या घटनेबाबत सुभाष राठोड यांनी प्रयागराज-उत्तर प्रदेश पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बेपत्ता झाल्यापासून या तिघांचाही त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रयागराज पोलिसांनी खेड पोलिसांशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याबाबत कळवले आहे.

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकणमार्गे विशेष रेल्वेगाड्या चालवल्या होत्या, ज्याद्वारे कोकणातील अनेक भाविकांनी प्रवास केला होता. याव्यतिरिक्त, काही भाविकांनी खासगी वाहनांनीही प्रयागराज गाठले होते. खेड तालुक्यातूनही मोठ्या संख्येने भाविकांनी या कुंभमेळ्यात सहभाग घेतला होता. शाहीस्नान आटोपून अनेक भाविक सुखरूप परतले असले तरी, सचिन चव्हाण, सिद्धांत राठोड आणि गिरीजाबाई यांचा मात्र अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही एकत्रितच कुंभमेळ्यासाठी गेले होते.

मात्र, कुंभमेळा संपूनही ते परत न आल्याने आणि त्यांच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी प्रयागराज पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. प्रयागराज पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू केले, परंतु अद्याप त्यांना कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. नातेवाईकांनीही सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.

बेपत्ता झालेले तिघेही खेड तालुक्यातील रहिवासी असल्याने प्रयागराज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार यादव यांनी खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी बेपत्ता असलेले तिघे त्यांच्या मूळ गावी परतले आहेत का, याची खात्री करण्यास सांगितले आहे.

अपूर्ण पत्त्यामुळे स्थानिक पोलिसांनाही त्यांचा शोध घेणे एक मोठे आव्हान आहे.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके उपलब्ध माहितीच्या आधारे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत आहेत. या बेपत्ता व्यक्तींविषयी कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *