कोकण : हवामान खात्याचा इशारा ठरला खरा, कोकणात पावसाचा हाहाकार!

banner 468x60

काल हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा आज खरा ठरला असून महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर कुठे कुठे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. यासोबतच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर रेड अलर्ट दिलेल्या रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली होती. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. खेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गावातील जगबुडी नदीला पूर आला आहे. जगबुडी नदी परिसराजवळ पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. त्याचबरोबर नगर परिषदेचे कर्मचारी पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेवून आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण पूर्ण संचय क्षमतेनं भरलं आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *