रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा बंदर परिसरातील मलबार जेट्टी येथे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी रंगेहात पकडले.
नेपाळमधील डडेलधुरा, रुपाल येथील मोहनसिंग रामचंद्र भट (वय 28) हा संशयित 14,600 रुपये किंमतीचा सुमारे 300 ग्रॅम गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी
शहर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई केली असून घटनास्थळी ई-साक्ष पंचनामा करण्यात आला. या कारवाईत शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पीएसआय सागर शिंदे, पोलीस कर्मचारी अमोल भोसले, भालेकर, मुन्ना हातिसकर, रणजित जाधव आणि डीबी स्कोड पथक सहभागी होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















