केळशी : खेळायचं कुठे? केळशीतील मुलांच्या प्लेग्राउंडची दुरवस्था, मुलांसाठी खेळाचे मैदान की अपघाताचे ठिकाण?

banner 468x60

केळशी समुद्रकिनारी असलेल्या लहान मुलांच्या प्लेग्राउंडची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खेळणी तुटलेली, गंजलेली व काही ठिकाणी धोकादायक अवस्थेत असल्यामुळे लहान मुलांना सुरक्षितपणे खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही.

त्यामुळे “लहान मुलं खेळणार तरी कुठे?” असा सवाल पालक व रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

तुटलेल्या व निकृष्ट अवस्थेतील खेळण्यांवर मुले खेळत असल्यास त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या केळशी समुद्रकिनाऱ्यावर मुलांसाठी सुरक्षित व सुसज्ज खेळाचे मैदान असणे अत्यावश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने या प्लेग्राउंडची दुरुस्ती करावी, नवीन व सुरक्षित खेळणी बसवावीत तसेच नियमित देखभाल ठेवावी, अशी ठाम मागणी स्थानिक रहिवासी व पालकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *