चिपळूण तालुक्यातील गाणे-खडपोली परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली आहे. जंगलात लागलेल्या वणव्यात होरपळून तारामती तुकाराम वाघे (वय ७०) यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, तारामती वाघे या मागील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्या काही अंशी मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्या अनेकदा घरातून निघून जात असत आणि काही वेळाने पुन्हा घरी परतत असत. यामुळे सुरुवातीला कुटुंबीयांनाही त्या पुन्हा परत येतील, अशी अपेक्षा होती.
दरम्यान, गाणे परिसरातील जंगलात चार दिवसांपूर्वी मोठा वनवा लागला होता. त्यानंतर एका व्यक्तीने जंगलातून लाकडाची फाटी आणण्यासाठी जंगलात गेल्यानंतर त्याला जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळील साडीवरून तो मृतदेह तारामती वाघे यांचाच असल्याची ओळख पटली.
या घटनेची माहिती तत्काळ अलोरे-शिरगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, जंगलात लागलेल्या वणव्याच्या तीव्रतेमुळे तारामती वाघे या होरपळून मृत्यूमुखी पडल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे जंगल परिसरात लागणाऱ्या वणव्यांच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वणव्यांच्या घटना वाढत असल्याने जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*