Breaking News
खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

दापोली : घरात कोणी नसल्याने घरफोडी करत साडेसहा लाखांची चोरी, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुरुड नवानगर येथे तब्बल ६ लाख ४० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी झाल्याची घटना १९ नोव्हेंबरला उघडकीस आली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी संशयित साहिम मुस्तफा ऐनरकर याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

banner 728x90 banner 728x90


दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखत रमीज ऐनरकर (३३, रा. मुरुड नवानगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १८ नोव्हेंबर दुपारी १.३० पासून १९ नोव्हेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने चोरी केली. निखत यांच्या चुलत सासू फरीदा अन्य ठिकाणी गेल्याने घर रिकामे होते.


या वेळी संशयित साहिम ऐनरकर याने घराच्या छतावरील कौले सरकवून घरात प्रवेश केला. लाकडी कपाटाचे लॉक तसेच लॉकर तोडून त्यातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरलेल्या ऐवजात ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ८० हजार रुपये किंमतीची ८ ग्रॅम सोन्याची चेन, ६० हजारांची साडेपाच ग्रॅम सोन्याची ब्रेसलेट तसेच २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा २५ ग्रॅम वजनाचा हार असा एकूण ६ लाख ४० हजारांचा ऐवज आहे.


या प्रकरणात साहिम ऐनरकर याला अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 331(4) आणि 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *