दापोली : मुळशी येथे दापोलीकडे येणारी एस.टी. बस बंद, वारंवार बंद पडणाऱ्या एस.टी. बसांविरोधात प्रवाशांचा संताप, नव्या गाडीची मागणी

banner 468x60

पिंपरी चिंचवडहून दापोलीकडे जाणारी एस.टी. बस (सकाळी ६.३० वाजता सुटणारी) आज, सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सुमारे सातच्या सुमारास मुळशी येथे बंद पडली. गाडीचा डिझेल पाईप फुटल्यामुळे बस पुढे जाऊ शकली नाही, अशी माहिती चालक व वाहकांनी दिली.

या बसमध्ये सुमारे ६० प्रवासी असून, ते गेल्या काही तासांपासून अडकले आहेत. दुसरी बस येण्यासाठी सुमारे दोन तासांचा अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा सुरू आहे. दरम्यान, अन्य मार्गावरील बस पूर्ण भरलेल्या असल्याने प्रवाशांना पुढील प्रवास करणे शक्य झालेले नाही.

असा प्रकार या मार्गावर वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिंपरी चिंचवड आगारातून दापोलीकडे पाठवल्या जाणाऱ्या गाड्यांबाबत नेमकी कोणती विचारधारा आहे का, की “गाड्या पाठवायच्या म्हणून पाठवल्या जातात, प्रवाशांची पर्वा नाही,” असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

प्रवाशांचा सवाल आहे की, सात तासांचा लांब प्रवास असूनही जीर्ण अवस्थेतील लोकल बस का सोडली जाते? प्रवाशांनी या मार्गासाठी नव्या गाडीची तात्काळ नेमणूक करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *