Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : पंचायत समितीसाठी शिंदे शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

banner 468x60

रत्नागिरीपंचायत समितीसाठी उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी शिंदेसेनेची दुसरी ११ जणांची यादी रविवारी जाहीर केली. निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी देत एकूण १६ उमेदवार जाहीर केले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पंचायत समितीसाठी पाचजणांची नावे जाहीर केली हाेती.

banner 728x90 banner 728x90

यामध्ये विद्या विलास बोंबले (हातखंबा), नेहा प्रवीण गावणकर (देऊड), सुमेश सुरेश आंबेकर (केळ्ये), डॉ. पद्मजा संजय कांबळे (नाणीज), परेश रामकृष्ण सावंत (साखरतर) यांचा समावेश हाेता. त्यानंतर रविवारी अन्य ११ जणांचे नावे जाहीर करण्यात आली आहेत. शिंदेसेनेने पंचायत समितीच्या माजी सभापती अनुष्का अभय खेडेकर यांना वाटद गणातून उमेदवारी दिली आहे. मागील कालावधीत त्यांचे पती अभय खेडेकर हे पंचायत समिती सदस्य होते. अनुष्का खेडेकर यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तर अन्य १५ उमेदवार हे नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

शिंदेसेनेचे दुसऱ्या यादीतील उमेदवार

वाटद : अनुष्का अभय खेडेकर, करबुडे : प्रवीण धोंडू पांचाळ, नेवरे : पूर्वा सचिन दुर्गवळी, कोतवडे : स्वप्नील सदानंद मयेकर, झाडगाव (म्युन्सिपल बाहेर) : साक्षी परेश कुमठेकर, खेडशी : वैभव विठोबा पाटील, नाचणे : सचिन सुधाकर सुपल, कर्ला : कांचन कृष्णकांत नागवेकर, गोळप : अर्चना तुषार साळवी, पावस नामदेव नारायण कोकरे, गावखडी : स्वाती संदेश शिंदे.

खेडशी पंचायत समिती गणातून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैभव पाटील यांचे वडील विठोबा पाटील हे यापूर्वी पंचायत समिती सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या मातोश्री वैभवी पाटील यांनी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *