संगमेश्वर तालुक्यातील भिरकोड येथे पोकलेन मशीनवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकाचा विश्वासघात करून साडेतीन लाख रुपये किमतीचा ‘रॉक ब्रेकर’ लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बिहारमधील संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय नामदेव नाळे (वय ४८) यांचा पोकलेन मशिनरीचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या मालकीचे पोकलेन मशीन (सिरीयल नं. २७५२८७१) आणि ओरियन कंपनीचा रॉक ब्रेकर (एल २२० मॉडेल, सिरीयल नं. ०८१-७५७५) चालवण्यासाठी आरोपी विकास कुमार महतो (रा. रामचंद्रपूर, जि. गोपालगंज, राज्य बिहार) याला चालक म्हणून नोकरीवर ठेवले होते.
२० मार्च रोजी सायंकाळी ६ ते २१ मार्च सकाळी १० वाजेच्या दरम्यान, भिरकोड (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर काम सुरू असताना, आरोपीने मालकाने विश्वासाने दिलेल्या मशीनसोबतचा ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा रॉक ब्रेकर चोरण्याच्या उद्देशाने त्याची विल्हेवाट लावली आणि तो तिथून परागंदा झाला.
मशिनचा महत्त्वाचा भाग आणि चालक बेपत्ता असल्याचे लक्षात आल्यानंतर संजय नाळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ३० मार्च रोजी रात्री ११ वाजता आरोपी विकास कुमार महतो याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३१६(४) अंतर्गत विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











