Breaking News
खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

दापोलीतील साखलोळी-शिवाजीनगर येथील रस्ता आणि पुलाची अत्यंत दयनीय अवस्था; ग्रामस्थांचा जीव धोक्यात!

banner 468x60

कोकणातील पर्यटनाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यातील विकासाचा दावा फोल ठरताना दिसत आहे. तालुक्यातील साखलोळी गावातील शिवाजीनगर वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची आणि तेथील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

https://chat.whatsapp.com/BINLtlqUZdb4dkguy5OSwi?mode=wwt

banner 728x90 banner 728x90

“रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” आणि पुलावरच्या लोखंडी शिगा उकडून वर आल्याचे दिसत आहे,असा प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.


पुलाची अवस्था झाली धोकादायक
साखलोळी-शिवाजीनगरला जोडणारा पूल सध्या जीर्ण अवस्थेत आहे. पुलाचे कठडे काही ठिकाणी तुटले असून, पायाही कमकुवत झाला आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी जात असल्याने, तर इतर वेळी जीव मुठीत धरून ग्रामस्थांना आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. एखादा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


रस्त्याची चाळण
रस्त्याची अवस्था तर त्याहून भयंकर आहे. डांबरीकरण उखडले असून आणि लोखंडी शिगा उघडून वर आल्याचे दिसून येत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि रुग्णांना या रस्त्यावरून दवाखान्यात नेणे म्हणजे एक दिव्यच ठरत आहे. रिक्षाचालकही खराब रस्त्यामुळे या भागात येण्यास टाळाटाळ करतात, त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया:
“गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या रस्त्याच्या आणि पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र, दरवेळी केवळ आश्वासने मिळतात, प्रत्यक्ष काम होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *