Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकणाने मारली बाजी

banner 468x60

इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून राज्याचा एकूण निकाल टक्के 94.10 लागला आहे.

banner 728x90 banner 728x90


मागील वर्षाच्या तुलनेत निकाल १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (10th Result) अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना आज निकाल पाहता येणार आहे.

यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. १५ लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. ९४.१० टक्के निकाल लागला आहे.

नागपूर विभागामध्ये 679 केंद्रावरून 1 लाख 51 हजार 379 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तर सर्वाधिक विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील होते. तेथून 58 हजार 495 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 12 वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यभरातील इयत्ता 10 विच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं, आता दहावीच्या निकालात कोण आघाडीवर राहते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

कुठे पाहाल निकाल?

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

https://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो करा

१. सगळ्यात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या http://mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.

२. वेबसाइटच्या होमपेजवर, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.

३. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्ही तुमचे लॉगिन डिटेल्स (नाव, हॉल तिकीट क्रमांक ) भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

४. यामुळे तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पाहू शकता.

५. सगळी माहिती बरोबर आहेत का ते तपासा.

६. निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं

दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. दहावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली.

मागील पाच वर्षांमधीय दहावीच्या निकालाचा आढावा

गेल्या पाच वर्षांमध्ये कसा होता इयत्ता दहावीचा निकाल कसा होता?

2024: 95.81
2023: 93.83
2022: 96.94
2021: 99.95
2020: 95.3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *