रत्नागिरी एमआयडीसी परिसरात वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करत विक्रीसाठी आणलेली तब्बल तीन कोटी रुपयांहून अधिक किमतीची ‘व्हेल माशाची उलटी’ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, हा
आंतरराष्ट्रीय स्तरावरील वन्यजीव तस्करीचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दि.३० ऑक्टोबर रोजी रात्री २१.२० वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एमआयडीसी रत्नागिरी परिसरातील टीआरपी ते एमआयडीसी रोडवर, बाफना मोटर्स कंपनीजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला काही संशयित व्यक्ती व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची गुप्त माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोहवा गणेश राजेंद्र सावंत यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. यावेळी,
आसीफ अस्लम मोरस्कर (वय ३८, रा. पिंपळी बद्रक, ता. चिपळूण), रोहीत रमेश चव्हाण (वय ३१, रा. आंबेशेत, ता.जि. रत्नागिरी) आणि तेजस पर्शराम कांबळे (वय ३२, मूळ रा. चिपळूण, सध्या रा. अमनतारा अपार्टमेंट, रत्नागिरी) हे तिघे संशयित रित्या आढळले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून कोणताही परवाना नसताना, प्रतिबंधित असलेली, सफेद काळपट रंगाची व्हेल माशाची उलटी जप्त केली. वजन काट्यावर मोजणी केली असता, प्लास्टिक पिशवीसह तिचे वजन ३ किलो ४ ग्रॅम इतके भरले आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत ३ कोटी रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत जप्त केलेल्या मालामध्ये ३ कोटी रुपयांच्या ‘व्हेल माशाच्या उलटी’सह, २,३०,००० रुपये किमतीची यामा कंपनीची मोटार सायकल (क्र. एमएच.०८. बीजे. १९८८) आणि ८,००,००० रुपये किमतीची सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार (क्र. एमएच. ०८. एएक्स. ४२९३) असा एकूण ३,१०,३०,०००/- (तीन कोटी दहा लाख तीस हजार) रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपींविरोधात वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ आणि ५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करत आहे. ही कारवाई वन्यजीव तस्करीच्या साखळीला मोठे आव्हान देणारी ठरली असून, रत्नागिरीत इतक्या मोठ्या प्रमाणात ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त होण्याची ही दुर्मिळ घटना आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















