रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी येथे रविवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास एक डंपर थेट घराच्या आवारात घुसल्याची घटना घडली. गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात हा डंपर शिरल्याने मोठी धावपळ उडाली.
मिऱ्या – नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा हा डंपर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर चालक कारवांचीवाडी स्टॉपजवळ चहा पिण्यासाठी टपरीवर गेला होता. त्यावेळी डंपर न्यूट्रलमध्ये असल्याने उताराच्या दिशेने गाडी सरकू लागली.
नियंत्रणाबाहेर गेलेल्या डंपरने प्रथम एका रिक्षाला धडक दिली. त्यानंतर तो थेट घराच्या आवारात घुसला. या अपघातात रिक्षा, दुचाकी, शेड, विहीर तसेच पाण्याच्या पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















