Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : शीळ धरणात 10 जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

banner 468x60

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गतवर्षीच्या तुलनेत १५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. उपलब्ध पाणीसाठी १० जूनपर्यत पुरेल इतका आहे. मात्र उच्चतम तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. नागरिकांनी गैरसोय होऊ नये यासाठी सध्या तरी आठवड्यानून

banner 728x90 banner 728x90

एकदाच दर सोमवारी पाणी कपात सुरु असल्याचे रत्नागिरी पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.शहराला दररोज १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. शहरातील प्रत्येक प्रभागात दररोज दीड तास पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता.

मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवेगळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला करण्यात येत होता. मात्र यावर्षी धराणातील पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील पाण्याची वेळ वेगवळी असून त्यानुसार पाणीपुरवठा केला जातो.

उपलब्ध साठा पाहून कपातीचा निर्णय घेण्यात येईल, मात्र कपात मोठ्या प्रमाणावर केली जाणार नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. पाणी सोडण्यासाठी विविध प्रभागात २१ लाइनमन कार्यरत आहेत. १५ जण देखभाल दुरुस्तीचे काम पहात आहेत. शहरात अद्याप दीड तास पाणी पुरवठा केला जात आहे. फक्त सोमवारी दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *