रत्नागिरीत व्याजी पैशांच्या व्यवहारातून फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणात तक्रारदार संदीप मधुकर वेलोंडे यांनी संशयित आरोपी विरुद्ध पोलीस तक्रार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांत भा रतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 318(4), 308(3), 3(5) आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 कलम 44 आणि 3 (a) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस अधिकारी श्याम अरामलकर करीत आहेत.
.
या प्रकरणात तक्रारदार संदीप मधुकर वेलोंडे यांनी संशयित आरोपी सावकार निलेश कीर आणि अॅड. महेश नलावडे यांनी 22 लाख 72 हजार ची फसवणूक केलेली आहे. तर अॅड. नलावडे यांनी विश्वास देवुन स्वतःचे ताब्यात ठेवलेले मूळ खरेदीखत आमचे परवानगीशिवाय निलेश कीर यांना देऊन माझा विश्वासघात व फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
15 मार्च 2017 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत हा गुन्हा घडला. फसवणुकीमध्ये अॅड. महेश नलावडे यांनी मला व साक्षीदार असणारे श्रीकृष्ण देवरुखकर यांना विश्वास
देवुन स्वतःचे ताब्यात ठेवलेले मुळ खरेदी खत आमच्या परवानगी शिवाय निलेश कीर यांना देवुन माझा विश्वासघात व फसवणूक केलेली. म्हणुन माझी निलेश किर व अॅड महेश नलावडे यांच्या विरोधात तक्रार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















