रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला पहाटे झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तसेच या अपघातात आणखी तिघे जखमी झाले.
या भयावह अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे भूतपूर्व सरचिटणीस निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई सर, वाहन चालक भगवान झगडे अक्षय निकम यांचे दुर्दैवी निधन झाले. हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ पहाटे ४ वा. झाला.
सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान आटोपून इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्या डंपरने जोरात धडक दिली. त्यामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला. हा अपघात इतका भयावह होता की दोघांचे जागीच निधन झाले. अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहन चालकांनी थांबून अपघातग्रस्तांना सहाय्य केले.
या इनोव्हा गाडीत माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक. रमाकांत पांचाळ सर, श्रीराम मंदिराचे विश्वस्त. संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर. किरण निकम, त्यांचे चिरंजीव. अक्षय निकम व नातेवाईक. प्रांजल साळवी तसेच वाहन चालक
. भगवान तथा बाबू झगडे असे ७ जण प्रवास करीत होते.
यापैकी तिघांचे दु:खद निधन झाले तर. किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. श्री. संतोष रेडीज. रमाकांत पांचाळ सर . प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















