रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास समुद्र स्नानासाठी उतरलेला अठरा वर्षीय युवक बेपत्ता झाला होता. या बेपत्ता युवकाचा शोध शुक्रवारी सायंकाळपासून सुरू असताना शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी तो बुडून मृत्यू झालेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी त्याला तात्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेण्यात आले. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
निखिल शिवाजी वाघमारे (वय १८ वर्षे) असे या मृत युवकाचे नाव असून तो केशवनगर सर्वे नंबर ५, घडसाशी डेरीजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे या ठिकाणाहून तो आपल्या फॅमिलीसहित गणपतीपुळे येथे आला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, गणपतीपुळे येथे शुक्रवारी निखिल व त्याचे आईवडील, दोन बहिणी व अन्य नातेवाईक गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते.
हे सर्वजण शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रात समुद्रस्नानासाठी उतरले असता त्यातील निखिल हा जाग्यावरून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक व पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याचा समुद्रात शोध घेतला असता तो आढळून आला नाही.
तसेच शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आणि शनिवारी दुपारपर्यंत गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्या मदतीने त्याचा शोध सुरू असताना तो शनिवारी (25 रोजी) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी आढळून आला. याबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















