रत्नागिरी : कार आणि एस. टी बसच्या अपघातात एकाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी शहराजवळील करावांचीवाडी येथे गुरुवारी आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कार आणि एस. टी बस यांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली आहे.

विकास नौसरे ( 34, रा. मुंबई) याचा मृत्यू झाला. तर अन्य एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला. स्वस्ति फायनान्स कंपनीचे कर्मचारी टाटा पंच कार (MH 04 LH 1678) मधून 5 जण मुंबईतील चेंबूर येथून रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीसाठी निघाले होते. कारवांचीवाडी येथे आले असता डायव्हर्जनचा अंदाज न आल्याने एस. टी. बसला त्यांची जोरदार धडक झाली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या विकास नौसरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवसरे हा ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता.

तो स्वस्ती फायनान्सच्या युनिट मॅनेजर या पदावर कार्यरत होता. मध्यरात्री १२ वाजता ते सर्व मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते. कारवांचिवाडी फाट्यावर असलेले डायव्हर्जन गाडीचालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे समोरासमोर ठोकर झाली.

हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहायला आले होते. मात्र सकाळच्यावेळी त्यांच्या कारला अपघात होऊन युनिट मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *