Breaking News
लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव

रत्नागिरी : बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 13 बांगलादेशींची मायदेशी होणार रवानगी

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील निरूळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या १३ बांगलादेशीयांची १५ मे रोजी बांगलादेशात रवानगी केली जाणार आहे. न्यायालयाने त्यांना ठोठावलेली सहा महिन्यांची शिक्षा १४ मे रोजी संपणार आहे.

banner 728x90 banner 728x90


लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी बांगलादेश-भारताच्या बॉर्डरवरील सुरक्षायंत्रणेच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या दहशतवादीविरोधी पथकाला ११ नोव्हेंबर २०२४ ला एक माहिती मिळाली होती.

पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांगलादेशी नागरिक राहत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून १३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. तपासात त्यांना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश करून राहत असल्याबाबत खात्री झाली.


त्याआधारे रत्नागिरी पोलिस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरोधात मुदतीमध्ये दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले. त्यांची गेल्या महिन्यात सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी १३ आरोपींना प्रत्येकी सहा महिने साधी कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

१४ मे २०२५ मध्ये १३ बांगलादेशीयांची शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यांना लगेच दुसऱ्या दिवसापासूनच बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. शासकीय परवानगीनंतर पोलिसांचे एक पथक या १३ बांगलादेशीयांना सीमेवरील बीएसएफच्या ताब्यात देणार आहे.

बांगलादेशीय नागरिकांची नावे
वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजू अहमंद हजरतअली शेख, बाकिबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा, अब्‍दुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरुझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद लालतू मोंदल किताब अलीस, अशी नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *