गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणारी केंद्रे अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपाताविषयी नागरिकांनी माहिती कळवावी.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांनी केले आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.
तरी अशा प्रकारचे कृत्य करताना आढळल्यास १८००-२३३-४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर तसेच १०४ या क्रमांकावर अथवा http://www.amchimulgimaha.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवावी. तक्रारीची खातरजमा होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्यास शासनाच्या बक्षीस योजनेअंर्तगत रु. 1 लाखापर्यंत बक्षीस देण्यात येईल.
संबंधितांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तरी असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















