Breaking News
खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा

रत्नागिरी : अंमली पदार्थांचा जिल्ह्याला विळखा ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि साडेपाच किलो गांजा जप्त

banner 468x60

अंमली पदार्थांचा रत्नागिरी जिल्ह्याला विळखा पडला आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत रत्नागिरी पोलीसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे.

banner 728x90 banner 728x90

नाचणेरोड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या जप्त केल्या. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कोकणनगर ते प्रशांतनगर दरम्यान 5 किलो 55 ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस दलाला दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे यांचे पथक गस्त घालत असताना नाचणे रस्ता ते गुरुमळी दरम्यान आडोशाला एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. चौकशी केली असताना त्या व्यक्तीचे नाव अदनान नाजीममियाँ नाखवा, वय 25 असे त्याने सांगितले.

त्याच्या ताब्यातील पिशवी तपासली असता त्यामध्ये ब्राऊन हेरॉईनच्या 154 पुड्या आणि इतर साहित्य सापडले. त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर आणि गणेश सावंत यांनी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतीश

शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा शोध सुरु केला होता. पोलीस उपनिरीक्षक शाम आरमाळकर हे कोकणनगर ते प्रशांतनगर दरम्यान गस्त घालत असताना एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळली. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो सांगली येथून गांजा घेऊन रत्नागिरीत आला होता.

मन्सूरअली निजाम पठाण, वय 40, रा. मिरज-सांगली असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे 5 किलो 55.5 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलीसांनी एकूण 3 लाख 25 हजार 500 रुपयांचा मुददेमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, उपनिरीक्षक शाम आरमाळकर, दीपक साळवी, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर, अमोल भोसले, आशिष भालेकर, कौस्तुभ जाधव, अमित पालवे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *