दापोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. दापोलीमधील जालगाव लष्करवाडी येथे २१ नोव्हेंबर दुपारी घरफोडीची धक्कादायक घटना घडली. घर उघडे असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात शिरून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून 12 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यात गु.र.नं. 225/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबीय बाहेर असताना चोरट्याने संधी साधली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व त्यांचे कुटुंबीय 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.15 ते सायंकाळी 4.30 या वेळेत बाहेर गेले होते. घाईघाईत घराचा दरवाजा कुलूप किंवा कडी न लावता उघडाच ठेवला होता. या दरम्यान अज्ञात चोरट्याने थेट घराच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करत किचनमधील लोखंडी कपाट उचकून चोरी केली.
मात्र कधी कधी आपण अति घाईत असतो आणि ती घाई किती महागात पडू शकते त्याच हे उदाहरण समोर आलं आहे.
चोरी गेलेला माल
रोख रक्कम : ₹2,50,000
सोन्याचे दागिने : ₹9,60,000
(सुमारे 10 तोळे 5 ग्रॅम वजनाचे)
एकूण ₹12,10,000/- किमतीचा माल चोरीस गेल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रार दाखल
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.50 वाजता फिर्यादी महिलेने दापोली पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून परिसरातील CCTV फुटेज तपासणे, आसपासच्या संशयित व्यक्तींची चौकशी करणे असे पुढील तपासाचे काम सुरू आहे. घर उघडे असल्याने हा प्रकार लक्ष ठेवून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















