मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून तसेच पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत दोन संशयितांनी वृध्दाची तब्बल 61 लाख 19 हजार 80 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
फसवणूकीची ही घटना शनिवार 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते शुक्रवार 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. कालावधीत नाचणे परिसरात घडली आहे.साई प्रसाद पुरुषोत्तम गावडे (65, रा.साई छाया सदन औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नाचणे,रत्नागिरी) यांनी शनिवार 28 डिसेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, संशयितांपैकी एकाने फिर्यादी यांना फोन करुन मी मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याची बतावणी करत फिर्यादींना तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याची भिती घातली.
त्यानंतर पोलिसांकडे तक्रारीकरता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा करत दुसर्या संशयिताने फिर्यादीशी 21 डिसेंबर ते 27 डिसेंबरच्या कालावधीत व्हॉटसअॅपवरुन हेमराज कोळी नावाचा पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करत संपर्क साधला.
त्यानंतर दोन्ही संशयितांनी संगनमताने फिर्यादीला तुमकच्या बँक खात्यातून 2 कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला असल्याची भिती घालून त्यांच्या बँक खात्यातून 61 लाख 19 हजार 80 रुपये काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली.
याप्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318,(4),319(2) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी),66(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*