Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

दापोली : जागा विक्रीचे 40 लाख रुपये न मिळाल्याने वृद्धाची आत्महत्या, संदेश कदम आणि अमोल गुरव दोघांविरोधात गुन्हा दाखल

Screenshot

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे राजवाडी येथील जयंत भागोजी दुबळे (वय ८०) यांनी जागा विक्रीत मिळायचे ४० लाख रुपये न मिळाल्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90 banner 728x90


३० ऑक्टोबर रोजी सकाळी दुबळे यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती त्यांच्या नातवाने दापोली पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तपास सुरु केला असता दुबळे यांच्या घरात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव (दोघे रा. हर्णे) यांनी जमीन विक्रीतील उर्वरित ४० लाख रुपये दिले नसल्याने जीवन संपवित असल्याचे नमूद केले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, दुबळे गेली दीड वर्ष या व्यवहारातील शिल्लक रक्कम मागत होते. अनेकदा दोघांकडे जाऊनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे मानसिक नैराश्येतून त्यांनी हे पाऊल उचलले, असे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणात संदेश कदम (४८) आणि अमोल गुरव (३९) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत. दरम्यान, रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *