चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफयिस्ट कंपनीच्या २२१ कामगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेले साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. या उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचाही मोठा पाठींबा मिळू लागला आहे. कंपनी व्यवस्थापनाने
२८ कामगारांना कोणत्याही परिस्थितीत कामावर न घेण्याची भूमिका घेतली आहे. तर कंपनीतील सर्व कामगार देखील जोपर्यंत संबंधीत कामगार घेतले जात नाही, तोवर हे उपोषण सुरू राहणार असल्याचे कामगारांनी सांगितले. गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीच्या कामगारांमार्फत शुक्रवार पासून साखळी उपोषण सुरू आहे. या कंपनीतील ५८ कामगारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता.
त्यापैकी ३० कामगारांना कंपनीने कामावर घेण्याची तयारी दर्शवली. मात्र उर्वरीत २८ कामगारांना कोणत्याही परिस्थितीत कामावर न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे हे उपोषण कंपनीतील सर्व २२१ कामगारांनी सुरू केले आहे. शनिवारी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि अलोरे शिरगांव पोलिस निरीक्षकांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली. मात्र उपोषणावर तोडगा निघाला नाही. कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनेत चर्चा न झाल्याने हे उपेषण सुरूच ठेवण्यात आले आहे.
काही दिवसांपुर्वी खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात साफयिस्टच्या कामगारांबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी राणे यांनी कंपनीच्या मालकाशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे संबंधीत कामगारांनी राणे यांची भेट घेतल्यानंतर ते शनिवारी उपोषणस्थळी येणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचा चिपळूण दौरा रद्द झाला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













