चिखलगाव : माजी विद्यार्थी मेळाव्यात शाळेच्या आठवणींना उजाळा, लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेच्या आठवणींनी बहरला माजी विद्यार्थी मेळावा

banner 468x60

चिखलगाव येथे लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेत माजी विद्यार्थी मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला.

लोकमान्य टिळक विद्यामंदिर शाळेतील आठवणींना उजाळा देणारा माजी विद्यार्थी मेळावा २०२६ उत्साहात पार पडला. या मेळाव्यास १९८४ ते २०२४ या कालावधीत दहावी व बारावीच्या ३२ बॅचमधील ३०० पेक्षा अधिक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

banner 728x90

शाळेचा परिसर दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हास्य, आनंद आणि आठवणींनी गजबजून गेला होता.

या मेळाव्यास डॉ. राजा दांडेकर आणि . रेणू दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच माजी शिक्षकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. गुरु–शिष्य नात्याचा भावनिक अनुभव या मेळाव्यातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.

संस्थेचे अध्यक्ष कैवल्य दांडेकर यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत उज्ज्वल भविष्यासंदर्भात मार्गदर्शन केले. प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे आणि दिनेश नाचणेकर यांनी माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या विविध क्षेत्रांतील यशाचा गौरव केला.

यावेळी रेणू दांडेकर यांनी घेतलेल्या विशेष तासाने उपस्थित विद्यार्थी भावुक झाले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली सांस्कृतिक नृत्ये आणि माजी विद्यार्थ्यांची मनोगते यामुळे कार्यक्रमात रंगत वाढली. उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

हा मेळावा माजी विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ करणारा व शाळेप्रती असलेला अभिमान वाढवणारा ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *