मंडणगड : बसस्थानकातुन वेळेवर गाड्या सुटत नसल्याची नागरीकांची तक्रार

banner 468x60

मंडणगड शहरातील एस.टी. बसस्थानकातून तालुक्यात अंर्तगत गावात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्या वेळेत सुटत नसल्याने विविध समस्या निर्माण झाल्याची तक्रार नागरीकांकडून करण्यात आली आहे.

या विषया संदर्भात प्रतिक गमरे, राहणार शिरगाव, सुशांत मोरे, मंडणगड यांनी आगार व्यवस्थापक यांच्याकडे 8 नोव्हेंबर 2024 रोजी सादर करण्यात आलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे.

एसटी बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत बस वेळेत न सोडल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. बस वेळेत न सोडल्याने प्रवाशांना त्यांच्या बस स्टॉप पासून गावाकडे अंधारात पायी चालत जावे लागत आहेत.

रात्रीच्या अंधारात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. बस वेळेत न सोडल्यामुळे नागरीकांना होत असलेला त्रास आणि समस्यांचा आपण विचार करुन या संदर्भात योग्य उचित कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या तक्रार अर्जाचे निवेदनावर प्रतिक गमरे, सुशांत मोरे, शैलेंद्र मर्चेंडे, महेंद्र बैकर, महेंद्र कदम, सुमित जाधव, नवीन जोशी, विशाल जाधव, कमलेश शिगवण, संतोष बैकर, दगडु साळुंखे यांनी तक्रार केली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *