संगमेश्वर : विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू , मोबाइल चार्जिंगला लावताना घडला प्रकार

banner 468x60

मोबाइल चार्जिंगला लावताना विजेचा धक्का लागून १६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोळंबे-सोनारवाडी (ता. संगमेश्वर) येथे घडली.

ही घटना शनिवारी (१६ डिसेंबर) सायंकाळी ४:४० वाजता घडली. रात्री उशिरा या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस स्थानकात केली. सुदीप किसन जाधव (रा. कदरापूर, ता. सिंदगी, जि. बिजापूर, सध्या रा. कोळंबे सोनारवाडी) असे युवकाचे नाव आहे.

सुदीप व कुटुंब कामानिमित्त कोळंबे सोनारवाडी येथे राहतात. तो राहत असलेल्या झोपडीजवळ मोबाइल चार्जिंगला लावण्यासाठी गेला होता.

यावेळी त्याला इलेक्ट्रिक बोर्डाच्या तारेचा धक्का लागला आणि तो जमिनीवर कोसळला, त्याला उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *