संगमेश्वर-साळकोंड येथे बेदरकारपणे एसटी चालवून समोरुन येणाऱ्या मिनी बसला धडक देत अपघात झाला आहे. हा अपघाता ३ डिसेंबर सकाळी ८.४५ वा. झालाय. अण्णा बाळासाहेब थोरात असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचं नाव आहे.
त्याच्या विरोधात पर्शुराम कृष्णा पवार यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पर्शुराम पवार हे आपल्या ताब्यातील मिनी बस (एमएच-४३- एच-४४१०) मधून लग्नाचे वऱ्हाड घेऊन प्रवास करत डिंगणी ते संगमेश्वर असे जात होते.
त्याच सुमारास एसटी चालक अण्णा थोरात आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-सीयु ६९२२) घेउन भरधाव वेगोन समोरुन येत होता.
ही दोन्ही वाहने साकळकोंड येथे आली असता थोरातचा भरधाव एसटीवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात एसटीची मिनी बसच्या उजव्या बाजूला धडक बसून हा अपघात झाला.
या प्रकरणी एसटी चालकाविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम २७९ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















