रत्नागिरी जिल्ह्यातील शहराजवळील चर्मालय परिसरात राहणारी 29 वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. ही घटना दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आयशा अरफाद पाटणकर (वय 29 वर्ष, राहणार-चर्मालय, मिल्लत प्लाझा, ता. जि. रत्नागिरी) असे बेपत्ता महिलेचं नाव आहे. आपल्या घरी कोणतीही कल्पना न देता अचानक घरातून महिला निघून गेली.
या बेपत्ता महिलेची उंची अंदाजे पाच फूट आहे. राहत्या घरातून अचानकपणे निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केला. मात्र ती आसपास कुठेही मिळून आली नाही.
त्यामुळे कुटुंबियांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या बेपत्ता महीलेबाबत कोणाला काही माहिती समजल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे 02352 222333/ 9422053334 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















