रत्नागिरी : जिल्ह्यात दोन नवे तालुके ?

banner 468x60

जिल्ह्यात पाली आणि पाचल किंवा रायपाटण हे दोन नवे तालुके करण्याच्या दृष्टीने पुन्हा हालचाली सुरु करण्यात आल्या असून, परिपूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

राजापूर तालुक्याच्या सह्याद्री लगतच्या पूर्व पट्टयाच्या गावांचे विभाजन करुन कामकाजाच्या दृष्टीने नवीन रायपाटण तालुक्याची निर्मिती करण्याची मागणी मागील आठवर्षापासून लालफितीच्या कारभारात अडकली आहे.

आमदार राजन साळवी यांनी २०१५मध्ये प्रथम मागणी करीत त्याचे निवेदन कोकण आयुक्तांकडे दिले होते. या मागणीचे पत्र २०१६ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते.

यानंतर त्यानंतर ग्रामपंचायत रायपाटण, पंचायत समिती उपसभापती यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तरळ यांनीही याबाबत मागणी केली होती. त्यानंतर रायपाटण तालुक्याच्या निर्मितीबाबत २०२०मध्ये तहसिलदारांनी अहवाल मागविला होता.

यावेळी लांजा तालुक्यातील विलवडे, शिरवली, व्हेळ, वाघ्रणगाव आणि रिंगणे या गावांनी विरोध करीत, गावांचा समावेश रायपाटण तालुक्यात न करण्याचा ठराव केला होता, तर आरगाव, कोंडगे व कुरंग गावांनी रायपाटण तालुक्यात सहभागी व्हायचे की नाही याबाबत कोणताच ठराव केला नव्हता.

दरम्यान, रायपाटणजवळच असणारे पाचल गाव हे पंचक्रोशीचे गाव असल्याने याठिकाणी पूर्व विभागाच्या दृष्टीने तालुक्याचे ठिकाण व्हावे व पाचल तालुका व्हावा म्हणून कृती समिती व ग्रामपंचायतीने विविध स्तरांवर मागणी केली.

राजापूरचे विभाजन करताना पाचल तालुक्याची मुख्यालयासह निर्मिती ती व्हावी ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुन्हा एकदा अभिप्राय मागवण्यास सुरुवात झाली आहे. तालुक्याचे

मुख्यालय पाचल किंवा रायपाटण असावे याबाबत परिसरातील ग्रामपंचायतींचे लेखी ठराव घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *