मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगाऊ ५ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक बाबु तांडेल, असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ६ मार्च ते ८ नोव्हेंब र २०२३ या कालावधीत रत्नागिरीत घडली. पोलिसांकडून
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नासीर अब्दुल गनी वाघू यांनी संशयित दीपक तांडेल याला २०२३-२४ वर्षाकरिता मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगाऊ ५ लाख ४० हजारांची रक्कम दिली होती;
मात्र संशयित स्वतः व इतर कामगार यांच्यासह कामावर आले नाही, तसेच दिलेली रक्कम ही परत न करता फसवणूक केली.
याप्रकरणी नासौर वाचू यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















