रत्नागिरी : मजगाव येथे मुलांना पाहण्यास घरी आलेल्या पतीवर सुरीचा वार

banner 468x60

मुलांना पाहण्यासाठी आलेल्या पतीच्या हातावर सुरीचा वार केल्याची घटना शनिवारी (दि. ११ नोव्हेंबर) रत्नागिरी शहरातील मजगाव रोड येथे घडली.

यामध्ये बशीर इन्साक प्रभूलकर हे जखमी झाले आहेत. बशीर प्रभूलकर व त्यांच्या पत्नीमध्ये १५ वर्षांपासून कौटुंबीक वाद सुरू आहे. त्यानंतरही ते आपल्या मुलांना पाहण्यासाठी रत्नागिरीत येतात.

शनिवारी दुपारी १२:२० वाजण्याच्या दरम्यान पत्नीच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी ‘तू माझ्या आई-वडिलांना फोनवरून शिवीगाळ, दमदाटी का करतेस.

विनाकारण माझ्या आईला त्रास का देतेस,’ अशी विचारणा केली.या रागातून पत्नीने स्वयंपाक घरातून छोटी सुरी आणून बशीर प्रभूलकर यांच्या उजव्या हाताच्या खांद्यावर मारली. तसेच शिवीगाळ करून ‘तू इकडे आलास तर बघून घेईन,’ अशी धमकी दिली.

याप्रकरणी पत्नीच्या विरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *