तालुक्यातील गणेशगुळे-गुरववाडी येथे ‘आईला शिव्या का घालतोस’, अशी विचारणा करणाऱ्या सख्ख्या भावाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात (Purnagad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत नागवेकर असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २३) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी मुकेश चंद्रकांत नागवेकर हे घरी जेवण करत असताना त्यांचा सख्खा भाऊ संशयित राकेश काही कारण नसताना दारूच्या नशेमध्ये आईला घाणेरड्या शिव्या घालत होता.
हे सर्व चालू असताना ‘तू आईला शिव्या का घालतोस’, असे विचारले असता राकेश याने मुकेशला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
त्यानंतर घराच्या मागील बाजूस ओढत नेऊन डोक्यात कवले मारून त्याला दुखापत केली. तसेच ‘तू जास्त बोललास तर तुला ठार मारून टाकीन’ अशी धमकी दिली. या प्रकरणी मुकेश नागवेकर यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















