रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाची वाट बिकट; विणीचा हंगाम लांबणीवर

banner 468x60

दुर्मिळ प्रजाती मानल्या जात असलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्र कासवाची मादी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर विणीच्या हंगामामध्ये अंडी घालण्यासाठी दरवर्षी येते.

मात्र, समुद्रामध्ये सातत्याने विविध कारणांमुळे होणारे बदल, पर्यावरणामध्ये झालेले प्रतिकूल बदल, तापमानामध्ये होणारे कमी-जास्त बदल या सार्‍यातून कासवाच्या विणीच्या म्हणजे घरटं करण्याच्या हंगामावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

त्यातून, घरटं करण्याचा ‘पिक नेक्स्टींग सिझन’ सुमारे महिनाभर लांबणीवर गेल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम अंड्यातून पिल्लं बाहेर येण्यावर (प्रजनन) होत आहे. प्रजनन काहीसे घटत असल्याचे प्राथमिक निरिक्षणे कासव अभ्यासकांकडून नोंदविली जात आहेत.

यावर अभ्यासकांमध्ये मतमतांतराची शक्यता नाकारता येणार नाही. बदलत्या भौगोलिक स्थानांबाबत ही निरिक्षणे वेगवेगळी असू शकतील. निसर्गातील प्रतिकूल बदलाव रोखणे वा त्यावर मात करणे सद्यस्थितीमध्ये अशक्यप्राय असले तरी, समुद्र परिसरासह पर्यावरणामध्ये होत असलेला प्रतिकूल बदल लक्षात घेवून ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या संवधर्नासाठी प्रयत्न सुरू असून यातून पर्यावरणाची जाणीवही वाढत आहे.

ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांच्या प्रजातीची मादी अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारपट्टीची निवड करते. सर्वसाधरणपणे नोव्हेंबर ते मार्च हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या कालावधीमध्ये मादी कासव वालुकामय भागात हायटाईड लेव्हलपासून सुमारे 50 ते 100 मीटर अंतरावर 1 ते 15 फूट उंचीचा खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालते.

सर्वसाधारणपणे शंभर ते दोनशे इतकी त्यांची संख्या असते. पहाटेच्या दरम्यान कासवाची मादी अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येते. सुमारे दीड फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये अंडी घालून समुद्रामध्ये परत जाते. सुर्योदयानंतरच्या स्वच्छ प्रकाशातून वाढणार्‍या तापमानाचा या अंड्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.

त्यामुळे सुर्यप्रकाश आणि तापमानाचा हा प्रतिकूल परिणाम होण्यापूर्वी ज्या स्थितीच्या तापमानामध्ये मादीने खड्ड्यामध्ये अंडी घातली होती त्या तापमानामध्ये त्या अंड्यांचे सुर्योदयापूर्वी योग्य पद्धतीने संवर्धन होणे अपेक्षित मानले जाते. त्याप्रमाणे सुर्योदय होण्यापूर्वी या अंड्यांचे कासवमित्रांकडून केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *