जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंबकल्याण सोसायटी, रत्नागिरी यांच्यातर्फे उमेदवारांकडून निव्वळ करार तत्त्वावर खलील पदांसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदरचे अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयाकडे सादर करायचे आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण संगमेश्वर, लांजा, राजापूर, गुहागर, अशा विविध ठिकाणी, वैद्यकीय अधिकारी, किटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे.
पदभरतीचा तपशील :
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १७ जागा
- किटकशास्त्रज्ञ (Entomologists) : ०९ जागा03. सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (Public Health Specialist) : ०९ जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : १८ जागा
एकुण रिक्त पदे : ५३ जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी पदासाठी : MBBS / BAMS उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
किटकशास्त्रज्ञ पदासाठी : एम एस्सी सह प्राणीशास्त्र मध्ये किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदासाठी : कोणत्याही वैद्यकीय पदवीधर सह आरोग्यांमध्ये MPH / MHA / MBA उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी : बारावी + डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन सह अनुभव आवश्यक असणार आहे .
जाहिरातीमध्ये नमुद केल्यप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज ‘जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी’ या पत्यावर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत सादर करायचे आहेत.
सदर पदभरतीसाठी खुल्या प्रवर्गाकरीता १५० रुपये तर राखची प्रवर्ग करीता १०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















