कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिऱ्यांचा हार चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. अनमोल आरके तिवडेवाड (वय-31) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
त्यानुसार पोलिसांनी हार चोरी करणाऱ्या चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनमोल तिवडेवाड हे 9 मे 2023 रोजी राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसमधून कोच नंबर बी-5 मधून प्रवास करत होते.
रात्री ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आली. यावेळी तक्रारदार अनमोल तिवडेवाड यांच्या झोपेचा फायदा उठवत चोरट्याने त्यांच्याकडील हिऱ्यांचा हार व 50 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली.
दरम्यान,आपल्या बॅगमधील बॅगमधील हार व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार सापडून आला नाही.
या प्रकरणी अनमोल यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













