राजापुर : युवतीला अश्लील मेसेज पाठवतो म्हणून जयान सोलकरला मारहाण

banner 468x60

युवतीला व्हॉटसअॅपवर अश्लील मेसेज पाठवतो याचा राग मनात धरून डोंगर येथील दोन युवकांनी राजापुरातील जयान अखिल सोलकर याला जबरी मारहाण केल्याची घटना शनिवारी १६ डिसेंबर रोजी घडली आहे.

या प्रकरणी राजापूर पोलीसांनी सउद सज्जान मस्तान व रिजवान हयात खान रा. डोंगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

banner 728x90 banner 728x90

दरम्यान या प्रकरणी त्या युवतीने देखील जयान अखिल सोलकर रा. सोलकर याच्या विरोधात त्याने आपला विनयभंग केला अशी तक्रार राजापूर पोलीसांत दाखल केली आहे.

या प्रकरणी देखील राजापूर पोलीसांनी सोलकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील डोंगर येथुन राजापुरात संगणक प्रशिक्षणासाठी येणाऱ्या एका युवतीला मी त्रास देतो.

व्हॉटसअॅपवर अश्लील मेसेज पाठवतो असा आरोप करत व त्याचा राग मनात धरून सउद सज्जान मस्तान व रिजवान हयात खान रा. डोंगर यांनी आपल्याला जबरी मारहाण केल्याची तक्रार जयान अखिल सोलकर याने राजापूर पोलीसांत दिली आहे.

या प्रकरणी राजापूर पोलीसांनी त्या दोघांच्या विरोधात भा.द.वि.स.क ३२४,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सोलकर याने आपल्या पुरवणी जबाबात मी दिनांक-१६/१२/२०२३ रोजी झालेल्या मारहाणी बद्दल राजापुर पोलीस ठाणे येथे दिनांक- १७/१२/०२०२३ रोजी सदरची मी फिर्याद दिली त्यावेळी मला मारहाण झाल्यामुळे मी भांबावलेलो होतो व त्या मनस्थितीत घडलेला प्रकार सांगितला होता.

परंतु आता मी माझी मनस्थिती ठिक असून सदर गुन्ह्याबाबत माझे अधीक सांगणे की, दिनांक-१६/१२/२०२३ रोजी सउद सज्जाद मस्तान वय-२३ वर्ष व रिझवान हयात खान वय-२० वर्षे दोन्ही रा. डोंगर मुस्लिमवाडी ता. राजापुर जि-रत्नागिरी यांनी मला त्यांचेकडील मोबाईल नंबर ९२२४७४९०७० या नंबरवरुन माझे मोबाईल नंबर ८४६८८५५१५१ यावर मला संध्याकाळी ०७.०० वा. मी मुलगी आहे असे भासवून मेसेज करुन माझी दिशाभुल करुन मला अमुल आईसक्रीम पार्लर राजापुर येथे ०९.०० वा.

भेटण्यास ये असा मला मॅसेज दिला त्याप्रमाणे मी अमुल आईसक्रीम पार्लर राजापुर येथे पोहचलो. व आईसक्रीम पार्लरला त्या मुलीची वाट बघत बसलो होतो तेव्हा तेथील एक सउद सज्जाद मस्तान वय-२३ वर्ष हा पाठीमागून माझ्या जवळ आला त्याने मला विचारले की तु जयान आहेस का त्यावर मी त्याला होय म्हणून सांगितले त्यावर त्याने मला गप गुमान तु

आमच्या बरोबर गाडीवर चल जर तु आवाज केलास तर ठार मारुन टाकेन अशी मला धमकी दिली. म्हणून मी त्याच्या बरोबर बाहेर आलो व त्यांचे अॅक्टीव्हा गाडीवर मध्ये बसवून मला डोंगर गावी प्राथमीक उपकेंद्राच्या पाठीमागील बाजूस नेले. तेथे माझ्याशी काही न बोलता त्या दोघानी माझे हातपाय तेथील लोखंडी ग्रीलला बांधून डांबून ठेवले.

व लॉखडी शीग व काठीने माझे पाठीवर, डावे हातावर, डोकीवर, डाव्या पायावर, उजवे बाजूचे पोठावर मारहाण केली. तेथे मला बराचेवेळ बांधून डांबून ठेवून तुला ठार मारुन टाकू अशी धमकी देवून परत त्यांनी मला त्यांचे अॅक्टीव्हा गाडीवर बसुन राजापुर येथील अमुल आईसक्रीम पार्लर मला सोडून परत ते निघून गेले असेही नमुद केले आहे.

दरम्यान त्या युवतीनेही जयान अखिल सोलकर याच्या विरोधात राजापूर पोलिसात तक्रार दाखल केली असून जयान सोलकर याने राजापूर शहरातील डोसानी प्लाझा येथे आपणास अडवुन विनयभंग केल्याचे नमुद केले आहे. तिच्या तक्रारीवरुन जयान अखिल सोलकर याच्यावर राजापूर पोलिसानी भादवी कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शिल्पा वेंगुर्लेकर या करत आहेत.

दरम्यान प्रेमप्रकरणातुन हा प्रकार झाल्याची चर्चा सुरू असून या एकूणच प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *