राजापूर : Barsu Refinery Project : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण पेटणार?
रिफायनरी प्रकल्प समर्थक शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (narayan rane) यांची दिल्ली येथे भेट घेत बारसू रिफायनरी प्रकल्प (barsu refinery project latest marathi news) काेकणातच (konkan) हवा असा पुन्हा एकदा आग्रह धरला आहे.
या शिष्टमंडळास नारायण राणेंनी सकारात्मकता दाखवत लवकरच केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त बैठक घेतली जाईल असे आश्वासित केले आहे. दरम्यान आगामी काळात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण पेटणार की शमणार अशी चर्चा काेकणात सुरु झाली आहे.
(Maharashtra News)बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन दाेन गट निर्माण झाले आहेत. एक रिफायनरी समर्थक. दुसरा रिफायनरी विराेधक. गेली अडीच वर्षे विराेधी गट बारसूला आंदोलनाच्या माध्यमातून प्रखर विराेध करीत आहे. यामुळे कोकण भागातील राजकारण तापत असते.
रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेत हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा अशी मागणी केली. त्यावर राणे यांनी निश्चित प्रकल्प लवकर मार्गी लागेल असे शिष्टमंडळास आश्वासित केले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी (hardeep singh puri) यांची भेट घेवून त्यावर चर्चा करणार असल्याचे राणे यांनी नमूद केले.
राजापूर येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत केंद्रीय भूमिका स्पष्ट करून ती भूमिका जानेवारीत उद्योग मंत्रालय केंद्र सरकार आणि उद्योग मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांची संयुक्त बैठक राजापुरात घेण्याचे आश्वासनही राणेंनी दिले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोबत राजापूरात सभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















