रत्नागिरी : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी लॅपटॉप ताब्यात

banner 468x60

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. गेल्या 3 महिन्यात या प्रकरणात अनेक खुलासे समोर आलेत दरम्यान काही दिवसानंतर या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.

दापोलीतील स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचारी नीलिमा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून लॅपटॉप जप्त केला आहे

banner 728x90 banner 728x90

. या लॅपटॉपमधील माहिती घेण्याचं काम आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. नीलिमाच्या कामाची स्थिती आणि तिच्यावर कामाचा दबाव होता, यासंबंधी माहिती या लॅपटॉपमध्ये असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.

यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. नीलिमाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नीलिमा चव्हाण हिच्यावर कामाचा दबाव होता. तसेच तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी संशयित संशयित संग्राम सुनील गायकवाड (रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हा सातत्याने देत होता.

यातूनच आपल्या मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी संग्राम गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यात असलेला लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आला.

या लॅपटॉमध्ये नीलिमाच्या कामासंदर्भातील माहिती असल्याचे सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *