Breaking News
रत्नागिरी : मुन्ना देसाईंसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; परशुराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल लांजा : उत्पादन शुल्कची धडक कारवाई, गोवा बनावटीचा मद्यसाठा व टेम्पोसह 23.63 लाखांचा मुद्देमाल जप्त गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप

रत्नागिरी : निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ?

banner 468x60

13 दिवसांनंतरही नीलिमा चव्हाण मृत्यूचं गूढ कायम आहे. चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

banner 728x90 banner 728x90

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


मात्र, तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी पोलिसांना अद्यापही यश आलं नाहीय. आम्ही या सर्व प्रकरणात एक पोल घेतला आहे. निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ? असा हा पोल आहे. Kokan katta Live चॅनलला subscribe केल्यानंतर community वर जाऊन आपण मत मांडा जे म्हणणं मांडायचं आहे ते मांडू शकता याबाबत आम्ही सविस्तर एक रिपोर्ट करत आहोत .

आतापर्यंत 553 वाचकांनी वोट केले आहेत ज्यामध्ये 83% वाचकांनी “हो” म्हटलंय तर 17% वाचकांनी “नाही” म्हटलंय. शुक्रवारी (11 ऑगस्ट) पोलिसांना अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यक्त व्हा : निलीमा चव्हाण प्रकरणात रत्नागिरी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटतेय का ? Kokan katta Live चॅनलला subscribe केल्यानंतर community वर जाऊन आपलं मत मांडा

आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे ते आपण मांडू शकता याबाबत आम्ही सविस्तर एक रिपोर्ट करत आहोत…👇🏻👇🏻👇🏻

दापोली येथील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी 29 जुलै रोजी निघाली होती. मात्र, तिचा 1 ऑगस्ट रोजी दाभोळ खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हाेती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात होते.

मात्र, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले होते. तपासात त्यांनी 104 साक्षीदारही तपासल्याचे सांगितले होते. त्याचवेळी व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले होते.

त्यामुळे पोलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पोलिसांनी केली होती.

हा अहवाल शुक्रवारी पोलिसांना प्राप्त झाला असून, तिच्या शरीरात कोठेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर कोठेही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *