मंडणगड : बाणकोटमध्ये लादी छातीवर पडल्याने कामागाराचा मृत्यू

banner 468x60

तालुक्यातील बाणकोट येथे आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या कामगाराच्या छातीवर लादी पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती मंडणगड पोलिसांनी सोमवारी दिली.

banner 728x90 banner 728x90

महाड तालुक्यातील कोथुरुडे निवाचीवाडी येथील नामदेव परशुराम वाघमारे हे बाणकोट येथे फिर्यादी यांच्या घरी आंबा बागेमध्ये फवारणी करणे, तसेच आंबा काढण्याच्या कामासाठी दरवर्षी येतात.

रविवारी सकाळी लादी उतरविण्याचे काम करीत असताना त्यांना अचानक चक्कर आली.

यामुळे लादी त्यांच्या छातीवर पडली. त्यांना डॉक्टर अनवरे यांच्या दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *