कोकण रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.नोव्हेंबर महिन्यात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यातून प्रवास करणाऱ्या 7 हजार 13 फुकट्या प्रवाशांना पकडले.
त्यांच्याकडून 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वे सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे.
तिकिट तपासणीत विनातिकिट प्रवास करणारे प्रवासी सापडत आहेत.नोव्हेंबर महिन्यातही कोकण रेल्वेने तपासणी मोहिम राबवली.त्या मोहिमेत तब्बल 7013 प्रवासी विनातिकिट प्रवास करताना आढळले.त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
एकूण 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोकण रेल्वे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करावा असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















