कोकण रेल्वे मार्गावर आज अडीच तासांचा ‘मेगा ब्लॉक’

banner 468x60

कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेमार्फत देखभाल मार्गाच्या दुरुस्तीची कामे करण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी देखील सावंतवाडीनजीक मडुरे ते मजोरडा विभागात अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.


या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दि. ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजून २५ मिनिटांपासून ११.५५ पर्यंत अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सोमवारच्या या मेगाब्लॉकमुळे गाडी क्रमांक १६३४५ ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस ४ डिसेंबरला रत्नागिरी ते सावंतवाडी स्थानकादरम्यान अडीच तास रोखून ठेवली जाणार असून १२६१९ ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू सेंट्रल दरम्यान धावणारी ४ डिसेंबर रोजीची मत्स्यगंधा एक्सप्रेस रत्नागिरी ते कुडाळ स्थानकादरम्यान अर्ध्या तासांसाठी थांबवून ठेवली जाणार आहे.

याचबरोबर मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक १७३१० ही वास्को-द-गामा ते यशवंतपूर दरम्यान धावणारी ४ डिसेंबर रोजीची एक्स्प्रेस गाडी वास्को-द-गामा येथून अर्धा तास उशिरा सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *