खेड : आगाराचा पुन्हा मनमानी कारभार

banner 468x60

खेड : लोटे ते महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड तयार होऊन सुद्धा खेड आगाराच्या खेड चिपळूण धावणाऱ्या बस सर्व्हिस रोडवरून न जाता काँक्रीटच्या रस्त्यावरून धावत आहेत.

परिणामी खेड चिपळूण दरम्यानचे लोटे पंचक्रोशीतील प्रवासी तसेच विद्यार्थ्यांमध्ये बसची वाट बघत नक्की कुठे थांबायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थी व प्रवासी काँक्रीट रोडवर थांबले तर चिपळूण आगाराच्या बस सर्व्हिस रोडवरून जात आहेत त्यावेळी धावत त्यांना सर्व्हिस रोडवर यावे लागते.

तसेच याउलट सर्व्हिस रोडवर बसची वाट पाहत थांबल्यानंतर खेड आगाराच्या बस काँक्रीट रोडवर जातात आणि पुन्हा या प्रवासी आणि विद्यार्थ्यांना धावपळ करत काँक्रीटच्या रस्त्यावर

बस पकडण्यासाठी धाव घ्यावी लागते या गोंधळात काँक्रीटच्या रोडवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एखाद्या वाहनाने या धावपळ करणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *