गेल्या काही दिवसांपासून खेड पोलिसांनी शहरातील मटका धंदे आणि जुगाराच्या अड्ड्यांवर धाड टाकून शहरातील मटकेधंदे आणि जुगाराचे अड्डे उध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे.
मात्र याचा काही प्रमाणात वचक बसलेला असतानाच पुन्हा नव्या दमाने मटका व्यावसायिक आणि जुगार व्यावसायिकांनी शहरात धुडगूस घातला आहे.
खेड शहरात मटके धंदे आणि जुगाराचे अड्डे उदंड झाले असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील गल्लोगल्ली मटके धंदे व्यावसायिकांनी बस्तान बांधलेले असतानाच तीनपत्ती जुगार खेळवणाऱ्यांनीही आपले बस्तान चांगलेच बसवल्याचे दिसत आहे.
खेड एस. टी. स्टँड परिसर, बाजारपेठ येथील वालकी गल्ली., पावसकर नाका., एस बी आय गल्ली., आनंद टॉकीज, याबरोबरच चिंचघर आणि रेल्वे स्टेशन परिसरात जुगार खेळणारे आणि मटका धंदे चालवणाऱ्यांनी सांकेतिक शब्दांचा वापर करत आपले धंदे सुरू ठेवले आहेत.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी कारवाईचा सपाटा लावलेला असताना काही प्रमाणात शहरातील अवैध धंदे करणारांवर पोलिसांचा वचक बसलेला होता.
मात्र कारवाई नंतर पुन्हा नव्या दमाने आणि जोमाने अवैध धंदे वाढताना दिसत आहेत. याच बरोबरच लोटे औद्योगिक क्षेत्रात मटका जुगाराचा व्हॉटस्पॉट झाल्याचे दिसून येते याचे परिणाम सर्वसामान्य
कुटुंबाला भोगावे लागत आहे. याची गंभीर दखल पोलीस अधिक्षक यांनी घ्यावी, अशी सर्वस्तरातून मागणी होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















