खेड : तरुणीचे बनावट अकाउंट तयार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी

banner 468x60

तालुक्यातील तरुणीचे बनावट अकाउंट तयार करून त्यावर फोटो व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी कर्नाटक बेळगांव येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

प्रतीक तानाजी चौगुले (वय २५ रा. भिडे कॉलनी, नॅशनल हायवे, यमगडणी, ता. चिकोडी बेळगांव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक चौगुले हा फिर्यादी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अज्ञात अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवून फिर्यादी जवळ जवळीक साधत होता.

काही काळाने सदर इन्स्टाग्राम अकाउंट बनावट असल्याचे लक्षात येताच तीने हे अकाउंट बंद केले, याचा राग मनात धरून आरोपी चौगुले याने फिर्यादी यांचा बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार जरून त्यांचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भा. द. वी. कलम ३५४ ड, ५०४, ५०६,५०७ आयटी ऍक्ट ६६ क, ६६ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पो. नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस शिपाई अजय कडू, वैभव ओहोळ यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *