गुहागर तालुक्यातील अंजनवेल बंदरात नांगरून ठेवण्यात आलेल्या नौकेला आग लागून नुकसान झाले.
बुधवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास तिला अचानक आग लागली.
या नौकेला लागलेली आग अन्य ग्रामस्थांनी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. नौकेची रस्सी आगीत तुटल्याने नांगर तुटून नौका समुद्राकडे वाहत गेली. दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने तिला समुद्र किनारी आणण्यात आलंय.
अंजनवेल भोईवाडी येथील मच्छी व्यावसायिक रंजना पडवळ यांच्या मालकीची ही नौका आहे. दर्याचा राजा नंबर IND / MH 4 MM-4883 या नौकेतून गिलनेट पद्धतीने मासेमारी करण्यात येत असे. मंगळवारी ही आग लागण्याची घटना घडली.
नौकेला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे आढळून आले. नौकेची केबिन व नौकेतील आतील भागाचे पूर्णत: नुकसान झाले. लागलेल्या आगीचा पंचनामा करण्यासाठी मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते. या नौकेचे झालेले नुकसान त्वरित मिळण्यासाठी नौकामालक रंजना पडवळ यांनी सहायक मत्स्य व्यवसाय रत्नागिरी विभाग यांच्याकडे निवेदन दिले आहे.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
नौकामालक रंजना पडवळ यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे.. हा व्यवसाय नष्ट झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















