दापोली : “कोकण कट्टा लाईव्ह” च्या बातमीनंतर दापोली आगारात लवकरच पोलिसांची नियुक्ती

banner 468x60

दापोली आगारात नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायाला मिळते. त्यामुळे दापोली आगारात आता पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे दापोली पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांनी सांगितलं आहे.


दापोली पोलिस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यात दिवाळी सण आल्याने आणि पर्यटकांची गर्दी वाढल्याने समुद्रकिनारे, पर्यटनस्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90


दापोली आगारात पोलिस कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. याबाबत कोकण कट्टा लाईव्हने वृत्त दिल्यानंतर दापोली आगारात लवकरच पोलिसांची नियुक्ती होणार आहे.
आगारात कर्मचारी उपलब्ध करुन देण्याच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्यात.


दापोली पोलिस निरीक्षक अहिरे यांनी सांगितलं की सर्वत्र कर्मचारी पुरविणे शक्य होत नाही पण कोणतेही कार्यक्रम अथवा अन्य बंदोबस्त नसल्यावर दापोली आगारात पोलिस कर्मचारी ठेवण्यात येतो.


मात्र, सध्या कर्मचारी कमी आणि वाढणारी पर्यटकांची संख्या, कार्यक्रम यामुळे बंदोबस्तात वाढ झालेली होती.
त्यामुळे दापोली आगारात पोलिस कर्मचारी दिसत नव्हता. तरीही कक्षात पोलिस कर्मचारी उपलब्ध नसला तरी पोलिस लक्ष ठेवून आहेत.


पर्यटकांचा हंगाम कमी झाला की, लवकरच दापोली आगारात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असं अहिरे यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *